बेळगाव आणि गोव्याचे नातं व्यापार उद्योगा देवाण घेवाण मध्ये चांगलं आहे सभापती झाल्याावर पहिलाच बाहेरील कार्यक्रम बेळगावात झाला याचा सार्थ अभिमान आहे.शांताई वृद्धाश्रमाचे कार्य उत्तम आहे. हे कार्य असेच वाढत जावो असे उदगार गोव्याचे सभापती राजेश पाटणेकर यांनी काढले.
आज बेळगाव येथील जीआयटी कॉलेज मध्ये आयोजित शांताई वृद्धाश्रम विद्या आधार अन्वये दिल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत कार्यक्रमात ते बोलत होते.व्यासपीठावर शांताईचे अध्यक्ष विजय पाटील, विद्या आधार चे अध्यक्ष विनायक लोकूर, जीआयटीचे गवरनिंग कौन्सिल अध्यक्ष यु एन कालकुंदरीकर, प्राचार्य देशपांडे हे उपस्थित होते.
बेळगाव गोव्याचं नात वर्षानुवर्षे चांगलं चालत आलेल आहे, त्याची वाढ व्यापार उद्योगा मुळे झाली आहे.चोरला मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे .अनमोड रस्त्याचे काम सुरू असल्याने अवजड वाहनांसाठी बेळगाव रेल्वे स्थानकातून गोव्याला रो रो रेल्वे सेवे अंतर्गत जोडण्या साठी प्रयत्न केले जातील.गोव्याच्या मुख्यमंत्री आणि रेल्वे राज्य मंत्र्यांच्या सोबत चर्चा करून यासाठी।प्रयत्न केले जातील. असे त्यांनी यावेळी सांगितले.
गोव्याच्या हद्दीत 90 टक्के चोरला घाट येतो .वाढलेल्या रहदारीमुळे अपघात ग्रस्तांना वेळेत मदत पोचावी यासाठी घाटात पोलिसांचे विशेष मदत (मोबाईल वाहन)पथक नियुक्ती बाबत विचार करू, अशी माहिती त्यांनी दिली.
विद्या आधार मधील विद्यार्थ्यांना त्याच्या हस्ते मदत वितरण करण्यात आले. शांताई चे कार्याध्यक्ष विजय मोरे, संचालक संतोष ममदापुर व इतर सदस्य उपस्थित होते.