धारवाड येथील एम एम कलबुर्गी हत्येप्रकरणी एसआयटी ने शहापूर येथील एक तरुणास ताब्यात घेतले आहे. एसआयटी च्या विशेष तपास अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
प्रवीण चतुर( वय 27) रा.शहापूर
या तरुणाला एसआयटी ने ताब्यात घेतले आहे.
ज्येष्ठ कन्नड लेखक, विचारवंत, साहित्यिक व संशोधक एम एम कलबुर्गी यांची हत्या केल्याच्या संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. कलबुर्गी खून प्रकरणात त्याचा प्रमुख सहभाग होता अशी माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी त्याला ताब्यात घेऊन धारवाड जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करून त्याला पोलीस कोठडीत घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे.