हलगा जवळील अलारवाड क्रॉस येथे 19 एकर 20 गुंठे जमिनीत महा पालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रकल्पाचे काम थांबणार नाही मात्र शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अधिकाधिक नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत प्रयत्न करू असे वक्तव्य पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे.बेळगावात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
एसटीपी प्लांट करण्याचा निर्णय दोन वर्षा पूर्वीचा आहे तो थांबवणे शक्य नाही मात्र शेतकऱ्यांना प्रति एकर 30 लाखांच्या पर्यंत नुकसान भरपाई मिळवून देऊ असे ते म्हणाले.
डी सी आणि शेतकऱ्यांचो बैठक होणार
रविवारी हलगा ग्रामस्थ शेतकऱ्यांची आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली होती या बैठकीत अनेक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत सोमवारी डी सी ऑफिस वर मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला होता मात्र पोलिसांनी जिल्हाधिकारी डॉ बोमनहळळी रुजू होता होताच शेतकरी प्रतिनिधी अधिकाऱ्यांची बैठक घेऊ असे आश्वासन दिले होते त्यामुळे सोमवारी हलगा शेतकऱ्यांचा मोर्चा पुढे ढकलला आहे.
दरम्यान हलगा येथील शेतकरी या सुपीक जमीन संपादन प्रक्रियेवर चिडलेले असून कोणत्याही स्थितीत कधीही आंदोलन करू शकतात त्यामुळे एस टी पी वरून बेळगावात वातावरण तापलेला आहे.