बेळगाव स्मार्ट सिटी प्रोजेक्ट चे एम.डी. डॉ एस जिया उल्ला यांनी माहिती खात्याच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन या प्रोजेक्टचा आराखडा प्रसिद्ध करत किती कामे सुरू किती होणार आहेत कोणकोणत्या कामाला किती निधी दिलाय याची माहिती दिली. वाचा बेळगाव स्मार्ट सिटी चे रिपोर्ट कार्ड
स्मार्ट सिटी प्रस्ताव दोन मुद्द्यांवर बनवण्यात आला आहे.1) ठराविक विभाग आधारित विकास (Area Based) 2) संपूर्ण शहर विकास याप्रकारे निधीचा विनियोग
• स्मार्ट सिटी फंड – 1000 कोटी
• केंद्र सरकारचा सहभाग – 50 %
• राज्य सरकारचा सहभाग – 50 %
• एकूण पब्लिक प्रायवेट पार्टनरशिप प्रोजेक्ट्स 395.61 कोटी
• विविध विभागीय योजना सहभागी निधी 1434.39 कोटी
झालेली आणि सुरू असलेली कामे –
1) कमांड आणि कंट्रोल सेंटर – 80.15 कोटी
2) वॅक्सिन डेपो येथील हेरिटेज पार्क गार्डन विकास– 1 व 2 – 22.82 कोटी
3) शहरातील 41.45 किमी अंतराच्या मुख्य रस्त्यांचा विकास स्मार्ट रोड, काँक्रीट रोड, ड्रेनेज लाईन,पेव्हर्स, सायकल ट्रॅक, भुयारी मार्ग आदी 281.98 कोटी
4) कलामंदिर येथे बहु उद्देशीय संकुल उभारणी 47.5 कोटी
5) भुयारी 182 किमी लांब LED इलेक्ट्रिक केबल व आकर्षक दिवे 23.00 कोटी
6) उद्यान विकास – 3.91 कोटी
7) सीबीटी, रेल्वे स्टेशन बस स्टँड विकास 44.50 कोटी
8) वंटमुरी प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रसूती गृहासाठी 30 बेड– 2.75 कोटी
9) बिम्स मध्ये ट्रामा सेंटर ची उभारणी – 3.00 कोटी
10) पाणी आडवा पाणी जिरवा केंद्र उभारणी 0.10 कोटी
11) स्मार्ट क्लासरूम ची निर्मिती (पहिली ते दहावी )
प्रयोगशाळा साहित्य 5.03 कोटी
12) महात्मा फुले पार्क ची उभारणी 2.85 कोटी
13) इतर विकासकामे
14) कणबर्गी तलाव विकास– 5.00 कोटी
15) Livestock पुनर्वसन केंद्र – 0.74 कोटी
16) बॅटरी वर आधारित रिक्षा – 1.05 कोटी
एकूण 568.00 कोटी निधीपैकी
232.00 कोटीची निविदा कामे मार्गावर
सर्व कामे 2020 पर्यंत पूर्ण करण्याची अट