सध्या बेळगाव शहरात पोलिसांचे नाव सांगून पालकांकडून अधिक पैसे उकळण्याचा प्रकार काही रिक्षाचालकांनी सुरू केला असल्याचे पोलीस दलाच्याच निदर्शनास आले आहे. यामुळे पोलीस आयुक्तांनी स्वतः एक प्रकटन देऊन आम्ही दुप्पट भाडे घेण्याची सूचना कुणालाही केलेली नाही हे स्पष्ट केले आहे.
सध्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात वाढलेले आहेत. यामुळे कर्नाटक उच्च न्यायालयाने अपघात टाळण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे अंमलात आणण्याचे आदेश संबंधित खात्यांना दिले आहेत.पोलीस खाते, कामगार खाते, सार्वजनिक बांधकाम खाते आणि परिवहन विभागांना या सूचना देण्यात आल्या आहेत.
या बजावलेल्या आदेशानुसार अंमलबजावणी करीत पोलीस खात्याने रिक्षाचालकांवर सहा पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने आण करू नये असा आदेश बजावून तसे न करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. याचा विरोध करून रिक्षाचालकांनी तीन दिवसांचा बंद पुकारला आहे. त्यानुसार बंदच आज पहिला दिवस आहे. तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवाशी व कामगारांची वाहतूक करू नये असाही आदेश बजावून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर काही रिक्षाचालक पालकांकडून दुप्पट भाडे वसूल करत आहेत तसेच फक्त सहा विद्यार्थी घ्या आणि तुम्ही एक विद्यार्थ्यांकडूनडबल भाडे घ्या अशी सूचना पोलीस खात्यानेच दिल्याचे सांगितले आहे. असे सांगत असून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. अशी सूचना किंव्हा आदेश आम्ही दिलेला नाही असेपोलीस आयुक्तांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.