Wednesday, January 8, 2025

/

आधी नो पार्किंग फलक लावा मगच टोचन लावा

 belgaum

बेळगाव शहरात रहदारीवर नियंत्रण आणण्यासाठी बेळगाव पोलिसांनी दोन नवीन टोचण वाहने ताफ्यात दाखल केली आहेत त्या नुसार नो पार्किंग मध्ये पार्किंग केलेल्या दुचाकी आणि चार चाकीवर कारवाई केली जाणार आहे.आधी शहरात नो पार्किंग फलक लावा मगच टोचन लावून कारवाई करा अशी मागणी पोलीस आयुक्ताकडे करण्यात आली आहे . सामाजिक कार्यकर्ते वकील हर्ष वर्धन पाटील यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन सादर मागणी केली आहे .

शहरात गाडी पार्क केलेल्या जागांवर सदर जागा पार्किंग आहे कि नॉन पार्किंग याची जाणीव वाहन धारकारांना येण्या अगोदर कारवाईचा बडगा उचलणे कितपत योग्य आहे असा सवाल करत आधी शहरात नो पार्किंगचे फलक बसवा मगच कारवाई करा असे निवेदनात म्हटले आहे.

harshavardhan-patil

शहरात ठिकठिकाणी फलक बसवण्याची जबाबदारी महा पालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे सामान्य जनतेला वेठीस धरत दंड वसूल करण्या ऐवजी पोलीस खात्याने या दोन्ही विभागांना पत्र लिहून आधी फलक बसवून घ्यावे मगच कारवाई करावी .

पोलीस आयुक्त म्हणतात की पार्किंग नसलेल्या ठिकाणी गाडी पार्क केल्यास टोचन लावून दंड वसूल करणार असे म्हणतात आधी पोलीस आयुक्त कार्यालयात गेल्यास गाडी पार्क कुठे करायची असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय. नियमानुसार नो पार्किंग मध्ये गाडी पार्क केल्यास १०० रुपये दंड आहे मात्र पोलिसांकडून टोचन शुल्क म्हणून १००० रुपये घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे सामान्य जनतेला वेठीस धरू नये अशी मागणी देखील त्यांनी निवेदना द्वारे केली आहे.

towing
towing

पोलीस खात्याने एका पत्रकाद्वारे खालील दंड वसूल करणार असल्याचे जाहीर केले आहे

दुचाकी – नो पार्किंग दंड १०० रुपये – टोचन फी ६५० रुपये एकूण ७५०

लहान चार चाकी – नो पार्किंग दंड १०० रुपये -टोचन फी १००० रुपये- एकूण ११०० रुपये
मध्यम चार चाकी – नो पार्किंग दंड १०० रुपये – टोचन फी १२५० – एकूण १३५० रुपये
अवजड वाहने – नो पार्किंग दंड – १०० रुपये – टोचन फी १५०० – एकूण १६०० रुपये

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.