ए व्ही एम हटवा देश वाचवा अशी मागणी करत बेळगावच्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केली आहे. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतीं निवेदनाची प्रत पाठवली आहे.
यापुढील निवडणुकीत ए व्ही एम मशीनचा वापर केला जाऊ नये या मशीन वरील निवडणूक प्रक्रिया पारदर्शी होत नसल्याचा आरोप देखील बेळगावातील ‘आप’ने केला आहे.
निवडणुका बॅलेट पेपर द्वारे घेण्यात याव्यात,सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशां मार्फत संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची चौकशी करावी केवळ दोनदिवसांत संपूर्ण देशात निवडणूक घ्यावी पाच दिवसाच्या कालावधीत निकाल जाहीर करावा यासह निवडणूक आयोगाच्या प्रमुखांवर गुन्हा नोंद करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
या शिवाय महाराष्ट्राचे माजी मंत्री गोपीनाथ मुंढे यांच्या मृत्यू ची पुन्हा चौकशी करावी देशातील 373 लोकसभा मतदारसंघात ए व्ही एम आणि व्ही व्ही पॅट मोजणीत फरक आला असल्याचा देखील आरोप आप ने केला आहे.सदानंद बामणे,गब्रिएल डिसोझा,एस के मुल्ला,प्रभू नायक,मिलिंद बोनगाळे आदी उपस्थित होते.