मच्छे ग्रामपंचायत अध्यक्षपदी अंजना तुकाराम कणबरकर यांची निवड झाली आहे. शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अंजना कणबरकर यांना 25 मते तर शांता चांगाप्पा हावळ यांना 21 मते पडली.
चार मतांच्या फरकाने कणबरकर या विजयी झाल्या तर एक मत बाद झाले.बेळगाव तालुक्यातील एक मोठी ग्राम पंचायत म्हणून या मच्छे ग्राम पंचायतीकडे पाहिले जाते या पंचायतीत एकूण 47 सदस्य आहेत.
तात्कालीन ग्रामपंचायत अध्यक्षा पद्मश्री हुडेद यांना हटविल्यानंतर या ग्रामपंचायतीचे हे पद रिक्त होते उपाध्यक्ष म्हणून असद हुजदार यांनी बराच काळ या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता.
अखेर शुक्रवारी अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये कणबरकर यांनी बाजी मारली निवडणूक अधिकारी म्हणून पी डी ओ वसंत कुमार आणि कृषी अधिकारी कल्याणी यांनी काम पाहिले.