बेळगाव जिल्ह्याचे कार्यकारी व वन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी शनिवारी बंगलोरमध्ये मेट्रो ट्रेनने प्रवास केला.राज्याचे मंत्री जर का बस ट्रेनने प्रवास करत असतील तर त्यांना सामान्य माणसांच्या समस्यांची जाणीव येऊ शकते. मुंबईत अनेकदा मंत्री व्ही व्ही आय पी लोकल ट्रेनने प्रवास केल्याचे पाहिले आहे मात्र कर्नाटकात कोणत्या मंत्र्याने ट्रेन मध्ये प्रवास केलेले पाहिलेलं अगदी कवचितच आहे.
दोन दिवसा पूर्वी रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांनी हुबळी बंगळुरू असा ट्रेनने प्रवास करत प्रवाश्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या त्यानंतर सतीश जारकीहोळी यांनी मेट्रोने प्रवास केला आहे.
गेल्या 20 वर्षा पूर्वी बेळगावचे बहुतेक आमदार मंत्री बंगळुरुला जाण्यासाठी बस किंवा ट्रेन चाच वापर करत होते आज आमदारांना बस प्रवास विनामूल्य आहे तरी देखील आमदार बंगळुरू ला जाण्यासाठी किंवा येण्यासाठी स्वतःची गाडी किंवा विमान प्रवासाला जास्त पसंती देतात
सतीश जारकीहोळी यांनी बंगळुरू मध्ये सामान्य माणसा प्रमाणे मेट्रो ट्रेन मधून प्रवास केलेला इतर आमदार मंत्र्यांनी देखील याचे अनुकरण का करू नये .