बेळगाव उत्तर चे आमदार अनिल बेनके यांनी आपल्या कामांचा धडाका सुरू केला आहे. सोमवार दि 17 रोजी त्यांनी महानगरपालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. प्रामुख्याने श्रीनगर येथील बेघर लोकांना नवीन घरे बांधून देण्याबाबत चर्चा केली आहे.
लवकरात लवकर खुली जागा शोधून जी 3 प्रकारची घरे 1603 कुटुंबांना बांधून देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची सूचना केली आहे.
श्रीनगर मध्ये एकाच कुटुंबाला दोन घरे मिळाल्याची चर्चा असून याचीही चर्चा करावी असे आदेश आमदारांनी दिले.
याचबरोबर 14 व्या वित्त आयोगातून मंजूर निधी उपलब्ध करून 10 कोटी पैकी प्रत्येक प्रभागाला 20 लाख प्रमाणे खर्च करण्याच्या सूचनाही आमदार अनिल बेनके यांनी केल्या आहेत.
पावसाळ्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता करा, पाणी साचून दुर्गंधी व डास निर्माण होऊ नयेत याची काळजी घ्या आणि आठ दिवसात सर्व कामे पूर्ण करा अशा सूचनाही केल्या आहेत.