बेळगाव सह सीमाभागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात शिक्षण घेण्यासाठी सीमाभाग प्रमाण पत्र देणे बंद केले आहे ते प्रमाण पत्र त्वरित द्या अशी मागणी करत जिल्हा पंचायत बैठकीत आंदोलन झाले.
कारदगा जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे यांनी सभागृहात अध्यक्ष आणि सी इ ओ आसना समोर ठाण मांडत जोरदार आंदोलन केले.सीमाभागातील विध्यार्थ्यांना महाराष्ट्रात कॉलेजमध्ये दाखला मिळवण्यासाठी शैक्षणिक सर्टिफिकेटची गरज आहे.निपाणी तहसीलदार आणि प्रांत अधिकारी हे सर्टिफिकेट देत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.तात्काळ त्यांना प्रमाण पत्र द्यावे अशी मागणी केली
जो पर्यंत विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिले जात नाही तोपर्यंत असेच ठिय्या आंदोलन सुरूच ठेऊ असा इशारा दिले स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल सरस्वती पाटील यांनी देखील सदर मागणी लावून धरली .यावर जिल्हा पंचायत सी ई ओ राजेंद्रन यांनी निपाणी तहसीलदार आणि ए सी फोन करून त्वरित शैक्षणिक प्रमाण पत्र देण्याचे आश्वासन दिले त्यावर त्यांनी आंदोलन मागे घेतलं.बेळगाव खानापूर निपाणी सह सीमा भागातील विद्यार्थ्यांना हे सर्टिफिकेट मिळणे यावर्षी पासून बंद झाले आहे.
आमदार अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार काका पाटील,वीरकुमार पाटील आणि लक्ष्मण चिंगले या काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांची भेट घेत सीमा भाग प्रमाण पत्र देण्याची मागणी केली आहे. सर्व तहसीलदाराना प्रमाणपत्र द्या असा आदेश द्या अशी मागणी केली आहे.