Monday, January 27, 2025

/

जयंत दादांनी विधानसभेत उमटवला सीमाप्रश्न

 belgaum

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यपालांच्या अभिभाषणात चौथा मुद्दा सीमाप्रश्नाचा मांडला गेला. राज्यपालांनी सीमाप्रश्नी आमचे सरकार संवेदनशील आहे असे म्हटले. त्याचा खरपूस समाचार विरोधीपक्षनेते जयंत पाटील यांनी घेतला आहे. सीमाभागावर अन्याय सातत्याने सुरू आहे .

या प्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याबद्दल निष्क्रियता आणि विलंब सुरू आहे. योग्यवेळी वकील सुद्धा त्या दाव्याला उपस्थित नसतात .असे असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सीमा सीमा भागाच्या समन्वयासाठी नेमण्यात आलेले चंद्रकांत पाटील झोपले होते का…? असा सवाल जयंत दादांनी उपस्थित केला. केंद्र सरकारने सीमाप्रश्न दाव्यात सलग दोन वेळा महाराष्ट्राच्या विरोधात प्रतिज्ञापत्रे सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केली.

Jayant patil

 belgaum

महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे असे असताना महाराष्ट्राच्या विरोधी प्रतिज्ञापत्र केंद्र सादर करत असताना मुख्यमंत्री व चंद्रकांत दादा पाटील झोपले होते का? असाही प्रश्न विचारून ज्यांची नियुक्ती सीमा समन्वयासाठी केली ते चंद्रकांत दादा एकदाही सीमाभागात आणि बेळगावात त्यांच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी गेले नाहीत. उलट ते नको ते करून आले अशी टीकाही त्यांनी केली.
भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आपल्याशी अतिशय घनिष्ट संबंध आहेत असे चंद्रकांत दादा नेहमी सांगतात.

त्यांच्या स्कूटरवरून आपण फिरलो की ते आपल्या स्कूटरवरून ते फिरले असं काहीतरी तो प्रसंग आहे, मात्र या घनिष्ठ संबंधांचा वापर करून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी भाजप सरकार प्रयत्न करत नाही. राज्यपालांच्या तोंडून तुम्ही काही वदवून घ्याल मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे, सीमा भागातील लोक आपल्याला भेटतात आणि त्यांची व्यथा सांगतात, हे सरकार या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करीत आहे असे सांगतात. सर्वोच्च न्यायालयाचा दावा केंद्र सरकार आणि कर्नाटक यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राने भक्कमपणे भूमिका घेण्याची गरज आहे. पण त्या बाबतीत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विधिमंडळातून जयंत दादा यांनी केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.