Sunday, November 3, 2024

/

युनिक अकॅडमीच्या वतीने बेळगावात स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन सुरू

 belgaum

इंडियन सिविल सर्विसेस च्या परीक्षा ए. बी.सी.व डी अशा चार गटात घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या ना देशाच्या विविध 24 खात्यात उच्च दर्जाची नोकरी मिळवता येते. या परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा प्रकारे होत असून सर्वसामान्यांची वयोमर्यादा 32 वर्षे, इतर मागास वर्गीय 35 वर्षे आणि अनुसूचित जाती -जमातिच्या विद्यार्थ्यांना 37 वर्षापर्यंत परीक्षा देता येते ‘अशी माहिती द युनिक अकॅडमी बेळगाव शाखेचे प्रमुख राजकुमार पाटील यांनी दिली.

स्पर्धा परीक्षा बाबत लवकरच मार्गदर्शन वर्ग सुरू होणार असून त्याबाबतची माहिती देण्यासाठी रविवारी सायंकाळी द युनिक अकॅडमी च्या कार्यालयात विद्यार्थ्यांसाठी सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. विविध विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतानाच त्यांच्या शंकांचेही ही पाटील यांनी निरसन केले .

Uniq acadamy

या परीक्षा फार कठीण असत नाहीत मात्र त्याची तयारी मोठ्या प्रमाणात करावी लागते. त्यासाठी कठोर परिश्रम, वेळेचे सुयोग्य नियोजन आणि स्वतः तयारी या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. या परीक्षामध्ये 250 गुणांचे 7 पेपर्स आणि 275 गुणांची एक व्यक्तिमत्व विकास परीक्षा घेतली जाते अशाप्रकारे एकंदर 2025 गुण असले तरीही 900 ते 950 गुण मिळवणारे विद्यार्थी निवडले जातात.

दरवर्षी चार लाख विद्यार्थी पूर्व परीक्षेला बसतात मात्र त्यातील फक्त वीस हजार जणच मुख्य परीक्षेला पात्र होतात. नीटनेटके नियोजन करून स्वतःला कोंडून घेऊन तयारी केल्यास परीक्षा पास होणे कठीण नाही असेही ते म्हणाले
सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये समाधान, देशभक्ती ,नोकरीची निश्चिती व आव्हान स्वीकारण्याची संधी मिळते त्याबरोबरच स्थिरता आणि एक प्रकारची ताकद प्राप्त होते असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नावरुन बेळगावमध्ये विद्यार्थ्यात आता जागृती झाली आहे असे दिसून येते

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.