विद्यानगर, बॉक्साईट रोड येथील एक घर फोडून घरातील 18 तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी मनोहर राजगोळकर यांचे घर फोडून हे दागिने लंपास करण्यात आले आहेत.
मनोहर हे आज सकाळी पत्नीला सोडायला बस स्टँड वर गेले होते. पत्नी गावाला जात असल्याने ते गेले व परत आले असताना ही चोरीची घटना त्यांना लक्षात आली.18 तोळे सोने म्हणजे जवळपास सहा लाखांचा ऐवज लंपास झाला आहे.
सकाळी 11 ते 12.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे.एपीएमसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.एकुणच वाढत्या चोऱ्या लक्षात घेऊन पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज आहे.