हलगा सांडपाणी प्रकल्पात सुपीक भू संपादन रोखण्यासाठी मदत मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना बेजबाबदार पणे वक्तव्य करत शेतकरी भावनेचा अपमान केलेल्या रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांनी हलगा भागातील समस्त शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी महिला शेतकरी नेत्या जयश्री गुरननावर यांनी केली आहे.
अलारवाड क्रॉस जवळील सुपीक जमिनीत सांडपाणी प्रकल्पाचे काम सुरू यासाठी सुपीक जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध चालवला आहे.मंगळवारी सकाळी शेकडो शेतकऱ्यांनी हलगा येथील सुवर्ण सौध गेट समोर धरणे आंदोलन केले त्यावेळी आंदोलनात सहभागी होऊन त्या बोलत होत्या.
‘मी तुम्हाला मतदान करा म्हणून तुमच्या कडून कधी मते मागितली नाहीत’ असे वादग्रस्त वक्तव्य अंगडी यांनी शेतकऱ्यां समोर केलेल आहे ते वक्तव्य बेजबाबदारीचे आहे असे त्या म्हणाल्या. बेळगावात केवळ तोंडे पाहूनच कोणत्याही प्रोजेक्ट साठी जमिनी बळकावल्या असा आरोप त्यांनी केला. हलगा मच्छे बायपास मध्ये आमदार अभय पाटील यांची जमीन का बळकावली नाही ? का केवळ सामान्य लोकांच्या जमिनी टार्गेट केल्या जातात?सतीश जारकीहोळी सुरेश अंगडी यांनी आपल्या मालकीच्या रस्त्याला अश्या प्रकल्पांना देऊन का जनते समोर आदर्श निर्माण करू नये असा संतप्त सवाल देखील त्यांनी केला.
जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यावेळी म्हणाल्या की बळजबरीने जमिनी घेणे ही तर सरकारची हुकुमशाहीच आहे ती मोडून काढायला हवी दरवर्षी विधान सौध मध्ये इथे अधिवेशन भरवता सांडपाण्याची वास हलग्याच्या लोकांनी का घ्यावी असा प्रश्न उपस्थित केला.सुपीक जमीनी ऐवजी सांडपाणी प्रकल्प डोंगराळ भागात करा? सुवर्ण सौध हलगा मच्छे बायपास आता हा प्लांट यासाठी नेहमी हलग्याच्या शेतकऱ्यांनीच का जमीन द्यावी असा प्रश्न देखील त्यांनी मांडला.
सकाळी अकरा वाजता मोर्चा काढत शेकडो महिला शेतकऱ्यांनी सुवर्ण सौध एस टी पी प्लांट हलगा येथून हद्दपार करा अशी मागणी करत आंदोलन छेडले होते दुपारी एक वाजता तहसीलदार मंजुळा नाईक यांनी गुरुवारी डी सी सोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले तरीही शेतकरी तहसीलदार यांना धारेवर धरतच होते.जो पर्यंत डी सी काम बंद करत नाहीत शेतकऱ्यांशी चर्चा करत नाहीत तोवर आंदोलन करू असा इशारा हलगा ग्रामस्थांनी दिला.सुवर्ण सौध गेट समोर प्रचंड पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे.