शेतात मशागत कामासाठी गेला असता सर्पदंश होऊन दोन फुट पाणी असलेल्या टाकीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.
आप्पाजी बाबर वय 50 रा कर्ले असे या मयत शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी सकाळी तो आपल्या शिवारात मशागत काम करण्यासाठी गेला होता सायंकाळी 6 पासून तो बेपत्ता होता त्या नंतर सोमवारी सकाळी बाजूच्या शेतात दोन फूट खोल पाण्याच्या टाकीत त्याचा मृतदेह आढळला होता.
सध्या ग्रामीण भागात शेती मशागतीची कामे जोरात सुरू आहेत रविवारी सकाळी ते जानेवाडी येथील शेतात नांगरणी चे काम करायला गेलेले ते रस्त्यावरून अनेकांनी पाहिले होते.सायंकाळी तो बेपत्ता झाल्या नंतर ते पाहून बाजूच्या शेतकऱ्यांने बैल घरी आणले होते बेपत्ता जग
झाल्याची माहिती ग्रामस्थांना मयताच्या घरातील लोकांना दिली होती.त्या नंतर गावातील लोकांनी शेतात वगैरे ठिकाणी रात्रभर शोध घेतला होता सोमवारी सकाळी शेळके यांच्या शेतात पाण्याचा टाकीत मृतदेह आढळला होता.
सोमवारी दुपारी ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती व सदर मृत्यू सर्प दंशाने झाल्याची माहिती माध्यमाना दिली.
या प्रकरणी ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.