लोकसभा निवडणुकीच्या अगोदर बदली झालेले शहरातील पोलीस निरीक्षक पुन्हा रुजू होणार आहेत.याबाबत राज्य पोलीस महासंचालकानी आदेश बजावला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिते नंतर बेळगाव सह राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या आता सर्व पोलीस अधिकारी आपापल्या पूर्वी असलेल्या ठिकाणी रुजू होणार आहेत. यापैकी बेळगाव पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रातील अधिकारी खालील प्रमाणे आहेत.
श्रीदेवी पाटील-महिला पोलीस स्थानक
जावेद मुशाफिरी-शहापूर पोलीस स्थानक बी आर गड्डेकर-माळ मारुती पोलीस स्थानक
एम देशनूर -टिळकवाडी पोलीस स्थानक
ए एस गोदीकोप्प-सी सी आर बी पोलीस
नारायण स्वामी-हिरेबागेवाडी
धीरज शिंदे-खडे बाजार
आर आर पाटील- रहदारी उत्तर
जे एम कालिमिर्ची-ए पी एम सी स्थानक
संजीव कांबळे-सी सी आय बी
यु एच सातेनहळळी -सायबर गुन्हे पोलिस स्थानक