ट्रक आणि कार मध्ये धडक होऊन पुणे बंगळूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे ठार झाले आहेत. आज दुपारी दीड च्या सुमारास ही घटना घडली आहे.
श्रीनगर गार्डन जवळ निसर्ग ढाब्याच्या जवळील भागात महामार्गावर हा अपघात घडला आहे.
कारमध्ये असलेल्या सहाजणांपैकी तिघे ठार झाले आहेत अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. रहदारी उत्तर विभाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू असून जखमींना उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेतून हलवण्यात आले आहे.
रस्ता दुरुस्त करण्यात येत असल्याने अडथळे निर्माण करण्यात आले होते. दुभाजकाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळत असून मयत व्यक्तींची नावे अजून समजू शकलेली नाहीत.