Saturday, April 27, 2024

/

विश्वासात न घेता शून्य विकास कामे

 belgaum

बेळगाव ग्रामीण मतदारसंघात ग्रामपंचायत सदस्य तालुका पंचायत सदस्य जिल्हा पंचायत सदस्य आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता शून्य विकासकामांचा विक्रम सुरू असल्याची चर्चा जोरात सुरू आहे . जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी यासंदर्भात जिल्हा पंचायत बैठकीतच आवाज उठवल्यामुळे हा मुद्दा चर्चेला आला असून स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता राजकारण करू पाहणाऱ्या आमदारांबद्दल अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी उपस्थित केलेला मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. सध्या बेळगाव तालुक्यात अर्थात ग्रामीण मतदारसंघात वेगवेगळ्या अदालत घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा आव आणला जात असताना, त्यावेळी नेमके स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलण्यात येत आहे. त्यामुळे जे काही करतो ते आपणच असे दाखवण्याच्या प्रयत्नात शून्य विकास काम आणि नागरिकांसमोर केवळ घोषणांच्या आणि अफवांच्या माध्यमातून हिरोगिरी करण्याचा प्रयत्न सुरू झाला असून त्याबद्दल चीड व्यक्त होत आहे .

एकदा आमदार पदावर निवडून आल्यानंतर संपूर्ण मतदारसंघातील व्यक्ती साठी काम करणे हे महत्त्वाचे असते मात्र आपल्या पक्षविरोधी लोक इतर पदांवर असल्यामुळे त्यांना विश्वासात न घेता केवळ आपल्याच नावाचा डंका गाजवण्यासाठी आमदार प्रयत्न करीत असल्याचे यावरून उघड झाले असून त्याची जोरात चर्चा आहे. आधीच पक्षांतर्गत राजकारणामुळे विकास कामांना वेळ मिळत नाही असा आरोप होत असतानाच आता स्थानिक लोकप्रतिनिधीही उघडपणे सभागृहात ठराव करू लागल्यामुळे आमदारांची भूमिका वादग्रस्त ठरली असून त्यांनी ही भूमिका बदलण्याची गरज व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.