बेळगावचे सांबरा विमानतळ आता पूर्वीच्या भव्यदिव्य स्वरूपात उपलब्ध होत आहे. 20 जून पासून एकूण विमानांची संख्या आठ होणार असून बेंगलोर हैदराबाद अहमदाबाद मुंबई आणि पुणे या पाच ठिकाणी ही विमानसेवा उपलब्ध होणार आहे. सध्या सर्व विमाने ही लहान प्रकारची आहेत. विमानतळ एअर बस आणि बोईंग एअरक्राफ्ट सामावून घेण्याच्या क्षमतेचे झालेले असले तरी एअर बस बंद करण्यात आली आहे .
आजवर विमानतळाला 370 एकर जमीन मंजूर करून देण्यात आली आहे. मात्र एकूण 344 एकर जमीन देण्यात आली असून अद्याप 26 एकर जमीन जिल्हा प्रशासनाने विमानोड्डाण प्राधिकरणाला दिलेली नाही. त्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला अनेकदा देण्यात आला आहे. मात्र जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून सध्या वाढीव जागेची गरज विमानतळाला भासत असताना जिल्हा प्रशासन उपलब्ध जागा केव्हा हस्तांतरित करणार?
हा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या विमानतळ कंपन्यांची ऑफिस यांची स्थापना करण्यासाठी जागा कमी पडत आहे. त्याचप्रमाणे दक्षिण बाजूने आणखी एक रस्ता विमानतळाला आवश्यक असून लवकरात लवकर जागा व रस्ता मिळावा अशी गरज आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाची भूमिका संदिग्ध ठरली असून, लवकरात लवकर वाढीव जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.