सोमवारच्या कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या सूवर्णसौधसमोरील धरणे आंदोलनात रयत गल्लीतील शेतकरी,महिलासह मूलं तसेच संपूर्ण वडगाव,शहापूर भागातील शेतकरी मोठ्या संख्येने हजर रहाणार आहेत.या बाबत शेतकऱ्यांनी बैठक घेत निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांची अनूमती नसतानां तीबारपीकी सूपीक जमीनीतून केंद्र व राज्य शासनाने विकासाच्या नावे पोलिसी दंडेलशाहीच्या जोरावर हालगा-मच्छे बायपास तसेच हालगा सांडपाणी प्रकल्प राबवत आहे. त्याला विरोध सूरुच आहे पण पून्हा सोमवार दिं १०/६/२०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता कर्नाटक राज्य रयत संघटनेनेसूध्दा येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सूवर्णसौधसमोर धरणे आंदोलन आयोजित केले आहे.
केंद्र, राज्य शासनाला सूपीक जमीन भूमीअधिग्रण कायदा रद्द करुन शेतकरी वाचवा तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या इतर मागण्या मान्य पूर्ण कराव्यात यासाठी देखील हे धरणे आंदोलन होणार आहे.रयत गल्लीतील शेतकरी, महिला,यूवक,मूलं तसेच वडगाव,शहापूर भागातील शेतकरीही मोठ्या संखेने आंदोलनात भाग घेऊन बायपास, सांडपाणी प्रकल्पाला विरोध करणार आहेत.
बेळगाव शहर परिसरातील शेतकरी बंधू,सामाजिक संघटनानीही या आंदोलनात हिरिरिने भाग घेऊन आंदोलन यशस्वी करावे असे रयत गल्ली शेतकरी समीती अध्यक्ष राजू मरवे,उपाध्यक्ष गंगाधर बिर्जे तसेच वडगाव शेतकरी संघटनेचेे पदाधिकारी रमाकांत बाळेकूंद्री, हणमंत बाळेकूंद्री यांनी आवाहन केले आहे.