येळ्ळूर येथील मराठी मॉडेल शाळेच्या वतीने पहिली मुला शाळेत नुकतीच प्रवेश करण्यासाठी येऊर भागात जोरदार जनजागृती करण्यात आली आहे प्रत्येक घराघरात जाऊन मराठी शाळेतच मुलांना पाठवा आणि मराठीचे भवितव्य घडवा असा प्रचार यावेळी करण्यात आला आहे त्यामुळे ही अभिनव संकल्पना अनेकांच्या मनात रुजली आहे येत्या काळात मराठी ची पटसंख्या वाढवण्यासाठी हे मोठे योगदान ठरणार आहे
बेळगाव जिल्ह्याबरोबरच सीमा भागातील शाळांची परिस्थिती पाहता प्रत्येक जण खाजगी इंग्रजी माध्यमात शिकवण्याची अपेक्षा ठेवत मातृभाषेकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे मराठी शाळा वाचवणे अवघड बनले आहे या पार्श्वभूमीवर येळळूर गावात मराठीसाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत प्रत्येक घराघरात जाऊन मराठीचे महत्त्व पालकांना समजून देण्यात येत आहे त्यामुळे मराठी ची पटसंख्या वाढवण्यासाठी येळळूर येथील शिक्षक वर्ग व पालकांनी तसेच शाळा सुधारणा समितीचे हे प्रयत्न यशस्वी ठरतील असा विश्वास अनेकातून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान मराठी पटसंख्या वाढवण्यासाठी जय होणारे प्रयत्न आहेत ते येत्या काळात झाले नाही तर मराठी शाळा अडचणीत येण्याची शक्यता आहे याचबरोबर कन्नड माध्यमांचेही हीच परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांचे प्रयत्न फोल ठरणार आहेत या सर्व पार्श्वभूमीवर यावर येथील शिक्षकानीं व पालकांनी हा अभिनव उपक्रम राबवून मराठी शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी चे प्रयत्न करण्यावर भर दिला आहे याच पार्श्वभूमीवर अनेक पालकांना आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान बाळगण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळेतील शिक्षक वर्ग व इतर शाळा सुधारणा समितीने या साऱ्यांना मी राबविलेला हा उपक्रम यशस्वी होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे .
यापासून वेळेवर गावात जोरदार मराठीचा प्रचार आणि अस्मिता टिकवण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत त्यासाठी शिक्षक वर्ग शाळा सुधारणा समिती आणि नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात येत आहे.