गोकाक तालुक्यातील अंकलगी गावातील युवक शिवकुमार उप्पार याला व त्याच्या कुटुंबास न्याय द्या . त्याचा मृत्यूची निःपक्षपाती चौकशी झालीच पाहिजे असे निवेदन विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले .
बुधवारी शहरातील सर्व प्रमुख चौकामध्ये निदर्शने करीत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतले. या प्रकरणाची योग्य चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली . जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून ,शिवकुमार हा गोमाता रक्षणाचे कार्य करीत होता . त्याने आत्महत्याच केली आहे असे सांगून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप यावेळी करण्यात आला .यावेळी बोलताना विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख कार्यकर्ते महांतेश वकुन्द यांनी ,शिवकुमारने गोहत्येविरुद्ध आवाज उठवला होता . यावरून त्याचा खून झाल्याची शंका आहे .
शिवकुमारने तयार केलेला व्हिडियो वायरल झाल्याने त्याच्या कुटुंबाला धमकावण्यात येत आहे . पण पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही . ती आत्महत्याच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे . निष्पाप तरुणाच्या मृत्यूला न्याय द्या अशी मागणी केली .यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .
एक तरुणांच्या संशयास्पद मृत्यूने वातावरण तापले आहे, आता पोलीस दलाला ठोस कारवाई करावी लागेल.