किल्ला येथील कॅटोंमेंट भाजी मार्केट ए पी एम सी मध्ये शिफ्ट करायला देणार नाही असा एकमुखी निर्धार भाजी मार्केट मधील व्यापारी संघटनेने घेतला आहे.या स्थलांतरास विरोध करण्यासाठी उद्या सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिवाकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
किल्ला मार्केट मध्ये दररोज दहा हजार लोक उपजीविका करत असतात त्यामुळे या निर्णयामुळे याचा फटका बसणार आहे ए पी एम सी मार्केट शिफ्ट होऊ देणार नाही मात्र या मोर्चा दरम्यान शिफ्टिंगवेळी दडपशाही झाल्यास होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा देखील देण्यात आला आहे.
यावेळी बोलताना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बदिवाकर पाटील म्हणाले की गेल्या 35 वर्षांपासुन किल्ला येथील व्यापारी आपला व्यवसाय करत भाजी व्यापार करत आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासुन व्यापाऱ्यांचा विरोध असताना देखिल जाणीवपुर्वक एपीएमसी येथे भाजी मार्केट स्थंलातर करण्याचा घाट घातला जात आहे. मात्र एपीएमसी येथील नुतन भाजी मार्केट येथे गाळ्यांची संख्या कमी असुन भाजी मार्केट येथे 230 व्यापारी आहेत. त्या सर्वांना एपीएमसी येथे गाळे उपलब्ध नाहीत तसेच एपीएमसी येथील गाळ्यांचा अगोदरच लिलाव करण्यात आला आहे इतकेंच काय तर सदर गाळे व्यापारी नसलेल्याना देण्यात आले आहेत असा आरोप केला.
व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातुन गांधीनगर जवळ नव्याने उभारण्यात येत असलेल्या व्यापारी कॉम्प्लेक्स दुकानासाठी अनेकानी रक्कम गुंतविलेली असुन काम सध्या बंद असले तरी याबाबत न्यायालयात लढा दिला जात असुन परवानगी मिळताच व्यापारी संकुलाचे काम पुर्ण होणार आहे. त्यामुळे नविन व्यापारी संकुलाचे काम पुर्ण होताच किल्ला येथील व्यापारी त्या ठिकाणी जाणार आहेत. तरी देखील शिफ्ट करण्याचा अट्टहास केला जातोय याला पुर्ण विरोध असुन, दडपशाही करुन स्थलांतरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला प्रशासनच जबाबदार राहील असेही त्यांनी नमूद केलं.
कोल्हापुर, सांगलीपेक्षा बेळगावचे भाजी मार्केट मोठे असुन येथील मार्केटमुळे 15 हजार कर्मचाऱ्यांना व्यवसाय उपलब्ध होत आहे त्यांना याचा फटका बसेल त्यामुळे शासनाला जाग आणून देण्यासाठी उद्या मोर्चा काढत आहोत असे व्यापारी संघटनेने म्हटलं आहे.यावेळी पत्रकार परिषदेला असोसिएशनचे सचिव के. के. बागवान, मोहन मन्नोळकर, राम हावळ, विश्वनाथ पाटील, सुनिल भोसले, सुरेश हावळ, संजय भावी, राजु ढोणी ,काका हावळ आदी उपस्थित होते.यावेळी पत्रकार परिषदेत शेतकरी लहान मोठया व्यापाऱ्यांनी गर्दी करत भाजी मार्केट शिफ्टिंगच्या निर्णयाला पत्रकाराना विरोध दर्शविला.यावेळी आय बी मुन्शी, गजानन पाटील,अकतर सनदी, अशोक काळजी,अशोक पाटील आदी व्यापारी उपस्थित होते.