Sunday, January 5, 2025

/

झाड जगवण्याचा अभिनव उपक्रम मुळातून उखडून पुनररोपण

 belgaum

वनविभाग, सार्वजनिक बांधकाम खाते, सामाजिक कार्यकर्ते किरण निपाणीकर आणि काही उद्योजक संस्थांनी मिळून एका ठिकाणी अडचण ठरणारी झाडे मुळातून उखडून पुनररोपित करण्याचा अभिनव उपक्रम आजपासून सुरू केला आहे. झाडे तोडण्यापेक्षा पुन्हा जगवण्याचा हा बेळगावातला पहिला उपक्रम आहे.
किरण निपाणीकर यांच्या पुढाकारातून पिरनवाडी येथील एक तलावाला संजीवनी दिली जात आहे, या तलावा शेजारी बॉक्साईट रोडवरील 33 झाडे लावली जात आहेत, आजपासून कामाला सुरुवात झाली आहे आणि 15 दिवस हे काम चालेल.

Tree replantation

2006 मध्ये कुमारस्वामी ले आउट करताना ही झाडे लावण्यात आली होती, आता ती मोठी झाली आहेत. रस्ता रुंदीकरण करताना ती तोडावी लागली असती त्यामुळे न तोडता विदेशात जसे झाडांचे पुनररोपण होते तसे करण्याची संधी मिळावी अशी विनंती किरण यांनी केली होती याला मान्यता देऊन वन विभागाने सहकार्य केले आहे.

विदेशाप्रमाणे आपल्याकडे यंत्रे नाहीत पण आहेत त्या यंत्रांचा वापर करून हे काम हातात घेण्यात आले आहे अशी माहिती वन अधिकारी कडोलकर यांनी बेळगाव live ला दिली.या उपक्रमात जय भारत फौंडेशन, पॉली हैड्रोन फौंडेशन,
बेळगाव फेरो कास्ट, अभिषेक अलोईज व स्नेहम इंटरनॅशनल यांचीही मदत होत असून पूर्ण सहभाग आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.