सांडपाणी प्रकल्पात जमीन गेलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी सुरू असलेले काम बंद पाडत जे सी बी सह इतर मशिनरी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना हुसकावून लावले.
बुधवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या आणि कामाला सुरुवात केली होती यावेळी शेतकरी आणि पोलिसांत संघर्ष झाला होता विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं.
शुक्रवारी दुपारी संतप्त शेतकऱ्यांनी संपादित जमिनीत प्रवेश करत काम बंद पाडलं 10 जे सी बी ट्रॅक्टर आणि काँक्रीट मशीनला हुसकावून लावले. अनेक महिला शेतकऱ्यांनी आपली केवळ पाच दहा गुंठे जमीन असून सदर जमीन संपादित झाल्यास आपण बेघर होणार आहोत कोणतीही नुकसानभरपाई न देता पिकाऊ जमीनी कश्या कब्जा घेता असा प्रश्न उपस्थित केला.
ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी देखील यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरत सदर जमीन संपादन करायची असल्यास या शेतीतचं शेतकऱ्यां सोबत बैठक घ्या अशी भूमिका घेतली.या ठिकाणी शेकडोच्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध केला पर्यायी जागा शोधा हा प्रोजेक्ट बंजारा जमिनीवर करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.अलारवाड क्रॉस जवळ 19 एकर 20 गुंठे जमीन संपादन करून सांडपाणी प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे.
मागील महिन्यात हलगा मच्छे बायपास रस्त्याचे काम देखील संतप्त शेतकऱ्यांनी दोनदा बंद पाडले होते मात्र पोलिसांनी दंडुकेशाहीचा वापर करत पुन्हा जमिनी बळकावल्याचं होत्या त्यांची पुनरावृत्ती या सांडपाणी प्रकल्पात होऊ नये हीच अपेक्षा…