प्रतीक्षेत असलेली बेळगाव अहमदाबाद ही विमानसेवा बुधवार पासून सुरू झाली आहे. उद्योजक संजय घोडावत यांच्या स्टार एअर या कंपनीने उडान योजने अंतर्गत बेळगाव हुन अहमदाबाद ही विमान सेवा सुरू केली आहे.

बुधवारी सकाळी बेळगाव विमान तळावर स्टार एअरचे अधिकारी आणि बेळगाव विमान तळ प्राधिकरणाचे संचालक राजेश कुमार मौर्य यांच्या उपस्थितीत उदघाटन झाले.

स्टार एअर ने या बेळगाव अहमदाबाद विमान सेवेसाठी 50 सीट क्षमतेचे विमान सुरू केले असून पहिल्या उदघाटनाच्या दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.पहिल्या दिवशी 86% भरलं होतं बेळगाव अहमदाबाद साठी 50 पैकी 43 अहमदाबाद बेळगाव साठी 41 प्रवाशांनी प्रवास केला आहे.

Star air
बेळगाव अहमदाबाद या विमान सेवेने बेळगाव हुन राजस्थान गुजरात जाणाऱ्यांची सोय होणार असून उत्तर भारतातील मुख्य शहराना जाण्यासाठी एक पर्याय मिळाला आहे.आता सर्वाधिक मागणी असलेली बेळगाव मुंबई विमान सेवा कधी सुरू होते याकडे लक्ष लागले आहे.

वेळा पत्रक

OG-107 बेळगाव अहमदाबाद 09:20 AM 11.05 AM रविवार सोडून दररोज 15 मे 2019 पासून
OG-107 बेळगाव अहमदाबाद 4.40 PM 6.15 PM दर रविवारी 15 मे 2019 पासून
OG-108 अहमदाबाद बेळगाव 11.25 AM 1 PM रविवार सोडून दररोज 15 मे 2019 पासून
OG-108 अहमदाबाद बेळगाव 6.45 PM 8.20 PM दर रविवारी 15 मे 2019 पासून