बेळगाव मध्ये शिवजयंती उत्सव सालाबाद प्रमाणे आणि परंपरेने साजरा केला जातो अशा वेळी चित्ररथ काढणाऱ्या मंडळांना कोणत्याही प्रकारे बॉण्डची सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त लोकेश कुमार यांच्याकडे केली, आपण सर्व पोलिस अधिकाऱ्यांना सूचना देऊन ते रद्द करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.
या बैठकीत वेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली ऐतिहासिक चित्ररथ मिरवणुकीचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात केले जाते ,या उद्घाटनाला आपण उपस्थित रहावे अशी विनंती मध्यवर्ती मंडळातर्फे करण्यात आली, शिवजयंती पूजन करून या मिरवणुकीस चालना द्यावी ही मागणी त्यांनी मान्य केली.
प्रशासन फक्त शिवजयंती आणि गणेशोत्सवात सक्ती करते इतर मिरवणुकांमध्ये अशी सक्ती केली जात नाही याची कल्पना दिल्यानंतर आपण हा प्रकार लगेच दूर करू असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले.
या चर्चेमध्ये प्रकाश मरगाळे, दीपक दळवी, विकास कलघटगी, रणजित चव्हाण- पाटील, गणेश दड्डीकर हे सहभागी झाले होते.