संतीबस्तवाड भागातील माजी ग्राम पंचायत सदस्य नागप्पा जद्दीमनी यांचा गुरुवारी रात्री खून झाल्याचा संशय आहे. बैलूर क्रॉस जवळ त्यांचा मृतदेह आढळून आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
नागप्पा हे संती बस्तवाड ग्राम पंचायतीचे माजी सदस्य होते काल रात्री ते घरातून बाहेर गेले होते ते परतलेच नाहीत.त्यांचे वय साधारणपणे 50 च्या सुमारास आहे. त्यांचा मृतदेह आढळून आल्याने नागरिकांनी पोलिसात खबर दिल्यानंतर खळबळ माजली आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टेम साठी पाठवला असून या मृत्यू मागचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
हा खुनाचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. वैयक्तिक वादातून किंव्हा राजकीय वैमनस्यातून हा खून झाला असावा असे बोलले जात असून पोलीस तपास झाल्यावरच सत्य समोर येणार आहे.या प्रकरणी खानापूर पोलीस अधिक तपास करत आहेत