Friday, December 20, 2024

/

असा वाघ होणे नाही! संभाजीराव पाटील श्रद्धांजली विशेष

 belgaum

वाघ हे एकमेव विशेषण संभाजीराव पाटील यांना लागू पडते. अनेकजण त्यांना साहेब म्हणून ओळखत. हे साहेबपण या वाघ दिलाच्या माणसाने स्वतः च्या कर्तृत्वावर मिळवले होते. सलग 50 वर्षे बेळगावच्या राजकारणात एक महत्वाचे स्थान त्यांनी मिळवले होते, असा वाघ परत बेळगावच्या इतिहासात होणे नाही….हे भले भले आणि त्यांचे विरोधकही मान्य करतील.

Ramesh kudachi sambhaji

राजकारण हा त्यांचा प्रांत नव्हता पण त्यांना राजकारणात आणले गेले. ते आले आणि राजकारणच त्यांना शरण गेले, काही निर्णय चुकले असतील पण जे निर्णय बरोबर झाले त्यांचीच चर्चा झाली. राजकारणात जसा दणकेबाज माणूस लागतो तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व होते आणि या व्यक्तिमत्वाने आपली एक वेगळी ओळख आणि जागा निर्माण केली होती. राजकारणात दुश्मन असावा तो ही संभाजी पाटील यांच्यासारखा, दोस्त असावा तोही संभाजी पाटील यांच्यासारखा आणि मार्गदर्शक किंगमेकर असावा तोही संभाजी पाटील यांच्यासारखा हे मान्य करावेच लागते.

Vega

बेळगाव महानगरपालिकेच्या दुसऱ्या बॉडीतले पहिले महापौर ते चारवेळा महापौर आणि पाचवेळा नगरसेवक होणे ही काही खायची गोष्ट नाही. आपली वोट बँक आणि जीवाला जीव देणारे कार्यकर्ते त्यांनी जपून ठेवले. शेवटच्या टप्प्यात आमदार होताना त्यांनी केलेले काम आणि जमवलेला लोक संग्रह कामाला आला. संभाजीराव पाटील हे एक नाव घेतले की भल्या भल्यांना कापरी भरत असे कारण या माणसाची एक डरकाळी अनेक समस्या सोडवण्यास पुरेशी होती.

Mohan more

त्यांनी आपल्या जीवनात अनेक चढ उतार पाहिले पण कधीच ते हरले नाहीत आणि खचले नाहीत. अखेरच्या काळात शारीरिक आणि आरोग्याच्या समस्यांनाही तोंड देत ते लढत राहिले आणि लढता लढताच त्यांनी निरोप घेतला.
आज ते नाहीत पण बेळगावच्या इतिहासात त्यांचे नाव सतत कोरलेले असेल, त्यांनी केलेल्या कामांची आठवण सतत येत राहील आणि पुन्हा एकदा असा नेता मिळावा अशी अपेक्षा त्यांना ओळखणारा प्रत्येक नागरिक आपल्या पोटातून मांडत राहील.

Iliyas

संभाजीराव पाटील यांची आमदार पदाची कारकीर्द प्रचंड गाजली आहे. ते आमदार झाले तेंव्हा पहिल्याच वर्षी कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये अधिवेशन भरविलेले असताना हा वाघ कर्नाटक विधानसभेत गरजला होता. या गर्जनेमुळे कर्नाटकातील कन्नड संघटनांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण संभाजीराव मागे हटले नाहीत, त्यांनी आपली महाराष्ट्रात सामील होण्याची भूमिका कायम ठेवली यामुळे त्यांना काहीकाळ निधीपासून वंचीत ठेवण्याचा प्रयत्न झाला पण त्यांनी प्रयत्न करून बेळगाव दक्षिण मतदारसंघात अनेक विकासकामे राबवली आहेत.त्यांनी मंजूर करून आणलेली अनेक कामे अजूनही सुरू आहेत. कामे मंजूर करून आणली तरी स्वतः कॅमेरे घेऊन जाऊन कुदळ फावडे मारून श्रेय घेण्यापेक्षा आपले कार्यकर्ते आणि नगरसेवकांना त्यांनी मोठेपणा दिला होता.

Sadhana

राजकारणावर हुकुमी पकड असणारा एक नेता ही त्यांची ओळख होती. शिक्षण कमी घेतलेले असले तरी महानगरपालिकेच्या कार्याचा अभ्यास करून त्यांनी सभागृहात मांडलेली सामान्य माणसाची बाजू त्यांच्या अभ्यासू कार्यपद्धतीची ओळख करून देते. सर्व धर्म समभाव ही त्यांच्या विचारपद्धतीची बाजू होती यामुळे मराठा समाजातील नेते असले तरी कन्नड, उर्दू आणि इतर भाषिकांचे नेते ही ओळख त्यांनी निर्माण केली होती. सर्व धर्म समान आहेत असे सांगून सर्व धर्मियांच्या हक्कांसाठी त्यांनी आपली शक्ती खर्ची घातली आहे, कोणीही एक धर्माची बाजू उचलून धरून जर घाणेरडेराजकारण करण्याचा प्रयत्न केला तर संभाजीराव त्याच्या विरोधात थांबत होते.

Sunil ashtekar

कुठल्याही धर्माच्या कार्यक्रमात सर्व शांततेत पार पाडायचे असेल तर हा वाघ एकटा भर रस्त्यात थांबून धीर द्यायचा, या त्यांच्या गुणांमुळे त्यांच्या जाण्याने बेळगावच्या इतिहासात एक नुकसान झाले आहे.

Sayaji

माजी महापौर आणि आमदार संभाजी पाटील यांना श्रद्धांजली द्यायची असल्यास बेळगाव live शी ( फोन :9590229030) संपर्क करा.
तुमची श्रद्धांजली पहातील रोज सरासरी 15 लाख व्यक्ती….

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.