बेळगाव जिल्ह्यातील गोकाकचे जारकीहोळी बंधू सतत राज्य राजकारणात चर्चेत राहतात, सध्या काँग्रेस मधील रिबेल स्टार रमेश जारकीहोळी यांना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तातडीने बेंगळूरला बोलावले असून ते रवाना झाले आहेत, तर दुसरीकडे वनमंत्री असलेले सतीश जारकीहोळी हे ऑपरेशन हात च्या तयारीत आहेत.
23 मे ला निकाल लागला की ऑपरेशन कमळ करून काँग्रेस मधील 20 आमदारांना फोडणार, निजद काँग्रेस सरकार पाडवणार आणि एडीयुरप्पा यांना मुख्यमंत्री करणार असा दावा भाजप करीत आहे, याला सतीश जारकीहोळी यांनी प्रत्युत्तर दिले आहे, भाजप फोडाफोडी करणार तर आम्ही काय हातावर हात धरून बसणार नाही कारण भाजपचे 20 आमदार आमच्याही संपर्कात आहेत, आम्हीही फोडाफोडी करणार असा पलटवार त्यांनी केलाय.
बंगळूर मध्ये सिद्धरामय्या यांच्यावर जेडीएस पक्षातून आरोप होत आहेत. काँग्रेस फुटण्यास सिद्धू हेच कारण आहेत असे आरोप झाले आहेत. मुख्यमंत्री असताना कामे केली नाहीत यामुळे काँग्रेसचे कमी आमदार निवडून आले असे आरोप झाले त्यामुळे सिद्धरामय्या यांनी तात्काळ रमेश जारकीहोळी यांना बोलावून घेतले आहे.
कॅबिनेट मधून डच्चू मिळाल्याने काँग्रेस मधून नॉट रीचेबल झालेले रमेश आणि सिद्धरामय्या मिळून आता काय खेळी खेळणार याकडे राज्याचे लक्ष आहे.