नाथ पै सर्कल मधील बॅरिष्टर नाथ पै यांचा नावाच्या नवीन फलकात बॅरिष्टर ही पदवी वगळण्यात आली होती याची दखल घेत युवा समितीने निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता याची दखल घेत पालिका प्रशासनाने जो ‘बॅरिष्टर’ याचा उल्लेख न केलेला फलकचं हलवला आहे.
या संदर्भात शुक्रवारी दुपारी पालिका आयुक्तांना निवेदन देऊन नामफलकातील चूक दुरुस्त करण्यात यावी यासंदर्भात निवेदन देण्याचा निर्णय घेतला होता व माध्यमातून आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला होता.दरम्यान नामफलकात झालेल्या चुकी संदर्भातील माहिती महा पालिका अधिकाऱ्यांना मिळाली,त्यांनी शुक्रवारी सकाळीच चौकात बसविण्यात आलेले दोन्ही नवीन फलक काढले आहेत. लवकरच या नामफलकात झालेल्या चुकीची दुरुस्ती करून ते फलक लावण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
मागील वेळी छत्रपती शिवाजी उद्यानासमोर स्वच्छता गृह हटवण्यासाठी युवा समितीने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता त्यावेळी देखील ते स्वच्छता गृह पाडवत पालिकेने युवा समितीची दखल घेतली होती आता केवळ निवेदन देऊ नंतर आंदोलन छेडू असा इशारा देताच पालिका प्रशासनाचे डोळे उघडले असून फलक बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे युवा समितीने निवेदन देण्याचा रद्द केले आहे.
बॅरिष्टर नाथ पै यांचे स्वातंत्र्य लढ्यात आणि सीमा आंदोलनात दिलेलं योगदान अनमोल आहे या शिवाय ते खासदार होते त्यामुळे बॅरिष्टर या त्यांच्या पदवीचा मान राखायला हवा त्यांच्या नावासमोर बॅरिष्टर असे लिहिल्यास त्यांना आदर दिल्या सारखे होईल.केवळ निवेदन देण्याचे ठरवून आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र या अगोदरच शासनाने फलक बदलाच्या हालचाली सुरू केल्याने आमची दखल घेतला आहे त्यामुळे निवेदन देण्याचे रद्द केले आहे .शहरातील नागरी समस्या वर आणि स्मार्ट सिटी अंमलबजावणी वर आम्ही असाच आवाज उठवत राहू अशी प्रतिक्रिया युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी बेळगाव live कडे दिली आहे.