मागील महिन्यात बेळगाव धामणे रोड वर झालेला अरुण नंदिहळ्ळी यांचा मृत्यू हा सकृतदर्शनी खून असल्याचे दिसून आले होते मात्र हा खून नव्हे तर दुसरंच काहीतरी भलतेच आहे असा तपास बेळगाव पोलिस दलाला लागत आहे . आता तपास उघड करण्यात आलेला नसला तरी या प्रकरणाचे धागेदोरे शोधून काढण्याच्या मुळाशी पोलीस अतिशय जवळ जाऊन पोचले आहेत अशी माहिती मिळाली आहे .
पेशाने शिक्षक असलेल्या आणि शिक्षक भरती व इतर कारणामुळे गाजत असलेल्या अरुण नंदिहळ्ळी यांचा भररस्त्यात गोळ्या घालून खून झाल्याचा प्रकार दर्शनाला आला होता, पण हा खून नसून वेगळेच काहीतरी आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे .पोलिसांनी तपास करून ही माहिती उघड केली आहे.
या प्रकरणात वापरण्यात आलेले शस्त्र पोलिसांच्या ताब्यात सापडल्यानंतर आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींचे जबाब घेतल्यानंतर ती घटना उघडकीला आली आहे. त्यामुळे खूनप्रकरणात ज्यांच्यावर संशय होता त्या व्यक्ती आता या प्रकरणात गोवल्या जाणार नाहीत अशी शक्यता आहे.हा खून नव्हता तर वेगळे काय होते ते पोलिसांनी स्पष्ट केल्यावरच सर्व जनतेला कळणार आहे.