दरवर्षी यंदा धूर निघणारच असे सांगून शेयर धारक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या संचालक वर्गाने यावर्षीही कारखान्याचा धूर काढलाच नाही. यामुळे आता शेतकरी व शेयर धारक भडकले आहेत. आत्तापर्यंत झालेल्या भ्रष्टाचाराचा धुरळा बाहेर काढण्याची तयारी सुरू झाली आहे. आमचे शेयर चे पैसे व्याजासकट परत मिळवून द्या अशी मागणी सरकार खात्याकडे करण्याबरोबरच सरकारने एक आयोग स्थापन करून आजपर्यंत कसे पैसे खाल्ले गेले व दिशाभूल करून कोण गब्बर झाले? याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात येणार आहे.
काही जागरूक शेयर धारकांनी ही तयारी सुरू केली आहे अशी माहिती बेळगाव live ला मिळाली आहे. आम्ही आपल्या हक्काचा कारखाना एक ना एक दिवस सुरू होईल या आहेत राहिलो पण कार्यकारिणी मंडळांना याची किंमत नाही असे दिसत असून आता शांत राहून चालणार नाही, हा सर्वात मोठा भ्रष्टाचार बाहेर काढून शेतकऱ्यांचे जमा पैसे काढून घेणे व सरकारी यंत्रणांकडून कर्ज रुपात घेतलेले पैसेही व्याजासकट वसूल करायला लावणे हेच उद्दिष्ट घेऊन काहीजण कामाला लागले आहेत.
गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या आणि सीमा भागातल्या शेतकऱ्यांना गरजेचा असलेल्या मार्कंडेय साखर फॅक्टरीला अखेर मुहूर्त मिळाला असे चित्र यावर्षी सुद्धा दाखवण्यात आले. काकती येथील मार्कंडेय शुगर फॅक्टरी मध्ये बॉयलर प्रतिपादन करण्यात आले.
यावर्षी 11 ते 20 फेब्रुवारी दरम्यान कारखान्याला अधिकृत सुरुवात होणार असल्याची माहिती जाहीर करण्यात आली होती, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात उदघाटन कार्यक्रमास मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी ,माजी पंतप्रधान देवेगौडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार ,वनमंत्री सतीश जारकीहोळी असे दिग्गज नेते उपस्थित राहतील असे सुद्धा जाहीर करण्यात आले होते .पण मे महिना संपत आला आहे, आता विचारले असता आचारसंहितेचे कारण दिले जात आहे, पण हे नेते येण्यापेक्षा कारखाना सुरू होणे महत्त्वाचे होते पुन्हा दिशाभूल कशासाठी आणि आचारसंहिता संपल्यावर उदघाटन होऊ शकले असते पण कारखाना का सुरू केला गेला नाही? हा प्रश्न शेयर धारकांना पडला आहे.
वरील सर्व राष्ट्रीय नेत्यांची वेळ पाहून उदघाटन कार्यक्रम ठरवण्यात येणार आहे असे जाहीर करून दिवस ढकलल्या त आले आहेत असाही आरोप होत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून मार्कंडेय साखर कारखाना उद उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहे या ना त्या कारणाने दिरंगाई होत होती अखेर याला ‘फेब्रुवारी 2019’महिन्याचा मुहूर्त मिळाला म्हणून आनंदात असलेल्या शेतकऱ्यांना आपला पुन्हा केसाने गळा कापला गेला आहे हे कळून चुकले आहे.आता शेयर धारकांच्या संतापाचा सामना करावा लागणार अशी चिन्हे दिसत आहेत.