कलामंदिर येथे खोदण्यात आलेल्या कुप नलिकेतून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करण्यात येत असून या परिसरातील विहिरी व कूपनलिकानी तळ गाठल्याने भूजल पातळी कमी झाल्याने या प्रकारचा पाणी उपसा थांबवावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
त्या भागातील विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी कधीच आटत नाही. मात्र यावर्षी पाण्याने तळ गाठला त्याचे कारण शोधण्याचे काम काही नागरिकांनी केले असता कलामंदिर मध्ये असलेल्या कूपनलिकेतून दिवसातून मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात येत असून येथून उपसलेले पाणी काँग्रेस रोडला मारले जात आहे, काँग्रेस रोडवर काँक्रीट करण्याचे काम सुरू असून येथे पाणी मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असून हे पाणी मारले जात आहे अशी माहिती मिळाली आहे.
या ठिकाणी जोरात उपसा होत असल्यामुळे इतर विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी आटले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना टँकरने पाणी आणण्याची वेळ आली आहे. तेव्हा तातडीने हा उपसा थांबवा अशी मागणी होत आहे.
या प्रकरणी माजी नगरसेवक अनंत देशपांडे यांनी पोलिसांत तक्रार दिली असून जर का बेकायदेशीर रित्या सुरू केलेली ही कुपनलिका बंद न केल्यास लोक स्वतः आंदोलन बंद करून करतील असा इशारा दिला आहे.