बेळगावात इलेक्शन संपले आणि सरकार आणि राजकीय पक्षांनी आपले खरे रंग दाखविण्यास सुरवात केली आहे काय आहे कुटील डाव युवा समितीचे साईनाथ यांनी लिहिलेला लेख वाचा…
हलगा-मच्छे च्या शिवारात तिबार पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी वर
बहुचर्चित रिंग रोड आणि हलगा-मच्छे बायपास साठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर जेसिबी फिरवून शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा प्रयत्न गेल्या ९ वर्षांपासून सुरु आहे पण वेळोवेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाशी दोन हाथ करीत आरेखन साठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना पळवून लावले, अधिकाऱ्यांच्या सतत च्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केली गेली त्यामुळे अधिकारी थोडे नरमले पण…. त्यावर अजून निकाल येणे बाकी आहे
पण लोकसभा २०१९ च्या निवडणूका संपताच आचारसंहितेचा लाभ घेत आणि कोर्ट ला २८ मे पर्यंत उन्हाळी सुट्टी असल्याने, कोर्टातून stay सुद्धा आणायला कोणायला जमणार नाही म्हणून मच्छे-हलगा बायपास रोड करण्याचा घाट पुन्हा सुरु केला गेला आहे
पोलिसांच्या दंडुकेशाही च्या जोरावर विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक करून त्यांना जेल मध्ये डांबून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे
विशेष म्हणजे विळ्या-भोपळ्याचे सख्य असणाऱ्या काँग्रेस आणि भाजपचे आमदार खासदार यावर चुप्पी केली आहे, भाजप राष्ट्रीय किसान मोर्चा चे उपाध्यक्ष सुद्धा बेळगावातले आहेत याबाबत एक हि शब्द त्यांच्या तोंडातून फुटेनासा झालाय.. म्हणजे या मध्ये त्यांचं नक्कीच काळंबेरं हाय…..
निवडणुकीच्या तोंडावर भाषाभेद, धर्म सोडून देशाचा विचार करा असे सांगणारे सुद्धा मूग गिळून गप्प आहेत त्यांचा आता तोंड च उघडत नाहीये
आम्हाला तर असा सुगावा लागलाय दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घाट घातलेल्या बायपास च्या बाजूने बऱ्याच जागा आहेत आणि तिथे स्वतःच्या फायद्यासाठी तिथे व्यापारी संकुल उभारणार आहेत, आणि मच्छे, उद्यमबाग इंडस्ट्रियल परिसरात बऱ्याच राजकीय धेंडांच्या फॅक्टऱ्या आहेत त्यांना तो मार्ग सुखकर होणार असल्यामुळे त्याला फटका बसू नये म्हणून विरोध करीत नाहीये हे विशेष….
त्यामुळे शेतकऱ्यांना वाली कोणीच नाहीये असे म्हणाला तरी हरकत नाही
विशेष म्हणजे बायपास आणि रिंग रोड खाली उध्वस्त होणारे ८०% शेतकरी हे मराठी आहेत.. उरलेल्या इतर भाषिकानी पैसे घेऊन एकतर शेतजमिनीत प्लॉट्स केलेत किंवा त्या सरकारला विकून तरी टाकलेत
म्हणून आवाहन आहे जर या शेत जमिनी गेल्या तर, हिरवळ नष्ट होऊन बेळगाव शहराचे वातावरण पुणे – मुंबई, विदर्भ प्रमाणे तापणार आहे हे विशेष म्हणून या कारस्थानाला विरोध करण्याची गरज असून,
सर्वानी आपले पक्ष, विचार बाजूला ठेऊन शेतकऱ्यांसाठी उभे राहिले पाहिजे
पोटाची भूक भागविणारा शेतकरी टिकला तरच हा देश टिकेल नाहीतर इतर देशाप्रमाणे ८०% अन्न धान्याची आयाती भारत देशाला कराव्या लागतील
-@साईनाथ शिरोडकर बेळगाव
#बेळगाव #मच्छेबायपास #विकास #belgaum #ringrod