बेळगाव शहरातील एक वेडिंग फोटोग्राफर म्हणून ओळखले जाणारे मूळचे चंदगड तालुक्यातील महिपाळगड येथील आणि सध्या चव्हाट गल्ली येथे पियुष फोटोच्या वतीने फोटोग्राफर सेवा करणारे प्रताप दत्ताराम आढाव( वय ५०) यांचा काल रात्री हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.
छायाचित्रकारांचे असे अचानक मृत्यू का होतात आणि त्यांनी दगदग कमी करण्यासाठी काय करावे या संदर्भात एक आठवड्याभरापूर्वी फेसबुकवर पोस्ट लिहिलेल्या आणि शाळेत असतानाच अपघात होऊन अधू झालेला आपला मुलगा पियुष साठी धडपडणाऱ्या पित्याचा मृत्यू झाला असून त्यांची झुंज अर्धवटच राहिली.
ते एक उत्कृष्ट छायाचित्रकार होते, ते मूळचे देवरवाडीचे असून चव्हाट गल्ली येथे त्यांचे वास्तव्य होते. गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला आज सकाळी दहा वाजता चव्हाट गल्ली येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. चार-पाच वर्षापूर्वी शाळेत झालेल्या एका दुर्दैवी प्रसंगामुळे त्यांचा मुलगा पियुष अधू झाला होता, त्याला चालता येत नव्हते मात्र हा पिता त्याच्या मागे खंबीरपणे थांबला होता सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने बारावी उत्तीर्ण झालेल्या पीयुषला उभे करण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. कोल्हापूर येथील एक हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यासाठी धडपडत होते.
आपल्या भागातील छायाचित्रकार मागील काही वर्षात 50 हून अधिक जण दगावले, यामुळे व्यथित होऊन त्यांनी एक आठवड्याभरापूर्वी पोस्ट लिहिली होती .मात्र दुर्दैवाने त्यांचाच हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. हा मृत्यू चटका लावणारा आहे. प्रताप यांनी सतत काम करत राहून आपल्या मुलाला उभे करण्यासाठी केलेली धडपड अर्धवट राहिली आहे.
माजी महापौर समाज सेवक विजय मोरे यांच्या प्रयत्नातुन प्रताप यांचा मुलगा पियुष वर उपचार होत होते मात्र प्रताप यांच्या निधनाने पियुष वरील उपचार कसे होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
फोटोग्राफर प्रताप आढाव यांनी लिहिलेली काय होती ती पोस्ट?
*फोटोग्राफर निष्काळजी का होतोय आपल्या आरोग्याबाबत*
हा लेख लिहिताना माझा BP वाढला व हात थरथरतोय हो!
गेल्या 10 महिन्यात 50+ फोटोग्राफरचा बळी हा टेन्शन, अपघात, हृदयविकार, आरोग्य व निष्काळजीपणा या कारण मुळे झालाय व वय 21 ते 45 वर्षे, व ते ही आयुष्याच्या उमेदीच्या काळात
का फोटोग्राफर याचा विचार करत नाही, आयुष्य व व्यावसायिकपणा याची सांगड घालतांना चुकतो का?
कर्ज, ऑर्डर्सची जीवघेणी स्पर्धा का तर कर्जाचे हप्ते, घरची पारिवारीक जबाबदारी पुर्ण करण्यासाठी, मानसिक खोटी प्रतिष्ठा जी कॅमेरा, लेन्स साहित्य अपग्रेडेशन यावरत होते या टेन्शन मुळे नवनवीन कर्ज घेतले जाते व जास्त उत्पन्नाची व बँक कर्ज फेडण्यासाठी जीव धोक्यात घालून स्पर्धा सुरु होते..आणि कळतनकळत सुरु होते
1) *आरोग्यकडे 100% दुर्लक्ष,*
2) टेन्शन,
3) पुर्ण झोप नाही,
4) धावपळ,
5) *रात्रीचे जागरण,*
6) नियोजन शुन्यता
7) *कर्ज फेडायचे नियोजन नाही*
8) संतुलित जेवन नाही
9) *वेळे अवेळी नाष्टा, जेवन,*
10) सतत बाहेरचे खाणे
11) मद्यपान, सिगरेट, गुटखा (काही अपवाद)
11) कौटुंबिक विचार
12) *विमा, मेडिकल नियोजन नाही*
13) सतत *बाईकवर प्रवास* व घाई
वरील गोष्टींचा सर्वानी सकारात्मक विचार करावा, एकमेकांनशी चर्चा करा, खरतर यावरच एक वर्कशॉप घेता येईल *फोटोग्राफर व आयुष्याचे नियोजन* याचा विचार करावा, अजुन बरच काही लिहीता येईल मला विषय खुप गंभीर आहे व मी पण फोटोग्राफरच आहे म्हणून माझे पण हात व मन थरथरतय..कारण
*जान है तो जहान है*
*फोटोग्राफर जगला तरच फोटो इंडस्ट्रीज टिकेल*