बेळगाव दक्षिणचे म.ए. समितीचेे माजी आमदार आणि बेळगावचे विश्वविक्रमी महापौर संभाजी पाटील(68) यांचे शुक्रवारी रात्री 8: 50 वाजता निधन झाले. शुक्रवारी रात्री त्यांना ह्रदय विकाराचा झटका येताच उपचारासाठी नेण्यात येत होते त्यावेळी वाटेत असताना संभाजीराव यांचे निधन झाले आहे. त्यांना बेळगावच्या के एल ई इस्पितळात उपचारासाठी नेण्यात येत होते.
संभाजी पाटील यांचा मृत्यू हा बेळगाव शहराची मोठी हानी आहे बेळगाव शहरातील एक वाघ आज गेला, प्रत्येक बेळगाव वासीयांसाठी ही धक्कादायक बातमी आहे.गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांची मूत्रपिंड बदली करण्यात आली होती तेंव्हा पासून ते आजारी होते.
गेल्या 4 डिसेंबर रोजी त्यांचे पुत्र सागर पाटील यांचे बंगळुरू येथे अपघाती निधन झाले होते त्यानंतर पाच महिन्यां नंतर माजी आमदार पाटील यांचे यांचे निधन झाले आहे.उद्या शनिवारी शहापूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.