शहापुरच्या विठ्ठलदेव गल्लीत एक मिरवणुकीतील डॉल्बी च्या आवाजाने इमारतीची काच फुटली, काय परिणाम होईल याचा विचार सुद्धा न करता डॉल्बी चा दणदणाट करण्यात आला होता पण पोलीस स्थानकात तकार दिल्यावर काच बसवून देण्यात आली.
आता या डॉल्बी च्या आवाजावर टाच आणण्याची गरज आहे. काल शहापूर येथे एक खासगी कार्यक्रमाची मिरवणूक जात असताना ही घटना घडली आणि डॉल्बी च्या आवाजाची चर्चा झाली आहे, ज्यांची काच फुटली त्यांनी पोलीस स्थानकात जाऊन तक्रार केली त्यामुळे नुकसान भरपाई मिळाली पण काच फुटतात लहान मुले किंव्हा कुणालाही जर काच लागली असती तर अनर्थ घडण्याची शक्यता होती, याचे भान त्या डॉल्बी लावणार्यांनी दाखवले नव्हते.
आजकाल शहरात कार्यक्रम असले की मिरवणूक काढण्याची पद्धत वाढली आहे, मिरवणूक काढली तरी चालेल पण डॉल्बी चा अमर्यादित आवाज करण्याची गरज नसते पण लोक हे लक्षात घेत नाहीत आणि अशा घटना घडत असून यावर टाच यावी लागेल.