बागेवाडी येथील एपीएमसीच्या स्वच्छतागृहांमध्ये संशयास्पदरीत्या मृत्यू झालेल्या गोरक्षा कार्यकर्ता शिव उप्पारच्या मृत्यूची सीआयडी चौकशी व्हावी आणि त्याच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी केली आहे.
शुक्रवारी त्यांनी बेळगाव शहरांमध्ये आंदोलन करून ही मागणी केली आहे. त्या वेळी श्रीराम सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उप्पार हा गोरक्षक होता त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली आहे, या संदर्भात चर्चा सुरू आहे मात्र पोलिसांनी हे प्रकरण दडपले आहे , चौकशी करून हत्या करणार्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
कुटुंबातील सदस्यांना करणार मदत
याचबरोबरीने बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके आणि भाजप नेते बसवराज पाटील यत्नाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन शीवुच्या हत्येचा आगामी आठ दिवसाच्या आत पोलिसांनी योग्य तपास करावा तसे न केल्यास डी सी ऑफिस समोर धरणे आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
शिवूच्या नातेवाईकाना अंकलगी येथील एका गो रक्षकाने अर्धा एकर जमीन मदत म्हणून देण्याचे जाहीर केले असून जिल्ह्यातील भाजप नेते आणि आमदार त्या पीडित कुटुंबाला घर बांधून देतील असेही बसवराज पाटील यत्नाल आणि बेनके यांनी म्हटले आहे.