बेळगाव डायॉसिस चे नूतन बिशप पदावर फादर डेरेक फर्नांडिस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पीटर मचाडो यांच्या नंतर बेळगाव डायॉसिस चे बिशप या पदावर त्यांची वर्णी लागली आहे.
14 मे 1954 साली जन्मलेले डेरेक फर्नांडिस यांनी 1979 च्या 14 मे पासून प्रीस्ट पद स्वीकारले आहे, बेळगाव डायॉसिस च्या वेगवेगळ्या चर्च मध्ये काम करून त्यांनी डायॉसिस चे प्रशासक पदाची जबाबदारी निभावली होती. त्यानंतर ते कारवार डायॉसिस चे बिशप होते, लवकरात लवकर ते बेळगाव डायॉसिस च्या बिशप पदावर आरूढ होणार आहेत.
ख्रिश्चन समाजाच्या सर्व बातम्या देणारे पत्रकार लुईस रोड्रिंक्स यांच्या सौजन्याने ही बातमी देताना सर्व कॅथलिक समाजाचे बेळगाव live अभिनंदन करीत आहे.पीटर मचाडो हे सध्या आर्च बिशप झाल्याने रिक्त झालेल्या पदावर डेरेक फर्नांडिस लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.
बिशप डेरेक फर्नांडिस यांच्या नियुक्तीची माहिती बुधवारी दुपारी रोम मधून कॅथॉलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडियाच्या सचिवांकडे आली होती.बेळगाव बिशप पदाचे कार्यक्षेत्र बेळगाव धारवाड गदग बागलकोट हावेरी आणि महाराष्ट्र चंदगड भाग सामील आहे.