बेळगाव शहराच्या बाबतीत ऐतिहासिक महत्व असणारी शिवजयंती मिरवणूक आणखी काही तासात सुरू होईल. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने सायंकाळी सहा वाजता उद्धाटन होऊन मिरवणुकीस सुरुवात होणार आहे.
बेळगावच्या शहरातील वेगवेगळ्या मंडळांनी आकर्षक पणे सजवलेल्या चित्ररथांची ही मिरवणूक सहा नंतर सुरुवात होऊन रात्रभर चालणार आहे. शिवरायांच्या काळातील इतिहासाचे प्रसंग दाखवणारी ही मिरवणूक पाहण्यासाठी अनेक भागातून लोक येत असतात. आजही शिवभक्त नागरीकांची गर्दी होणार आहे.
शहापूर भागातील चित्ररथ मिरवणूक आजच होणार आहे, काल वडगाव भागातील नागरिकांनी आपल्या शिवप्रेमाचे दर्शन दाखवून दिले आहे.