प्यास फाऊंडेशनने हाती घेतलेले भावीहाळ या गावातील तळेही आता पूर्ण झाले आहे ,2018 च्या उन्हाळ्यात अरळीकट्टी येथील काम पाहिल्यानंतर भावीहाळ येथील नागरिकांनी प्यास फाऊंडेशनला संपर्क साधून आपल्या गावातील तलावाचे पुनरुज्जीवन करावे अशी मागणी केली होती.
कित्तूर च्या दुष्काळग्रस्त भागातील या गावात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. भाविहाळ आणि परिसरातील 16000 नागरिक व 2000 जनावरांसाठी हा तलाव फार महत्वाचा होता त्यामुळे प्यास फाऊंडेशनने तातडीने काम हाती घेण्याचे ठरवले आणि आव्हान स्वीकारले ,आठ एकर जागेमध्ये या तळ्याचे पुनरुज्जीवन झाले असून सरकारी निधीच्या व्यतिरिक्त निधी गोळा करून हे काम करण्यात आले आहे.
प्यास फाऊंडेशनला विवेक प्रकाश या दिवंगत डॉ राजेंद्र प्रकाश यांच्या चिरंजीवांनी मदत केलेली आहे, ते शिक्षक आहेत आयआयटी रूर्की चे विद्यार्थी आहेत, संपुर्ण तळासाठी लागणाऱ्या कामाचा निधी त्यांनी दिला असून नागरिकांनी फाउंडेशन कडे कामाची मदत केली आहे.
अवजड मशिनरी चे पास हे सारे शेतकऱ्यांच्या मदतीने पूर्ण करून हे काम करण्यात आले आहेत चालू करण्यात आल्यानंतर सुरुवातीला पाण्याचा एक थेंब पाणी मिळत नव्हता. पाऊस सुरू झाल्यामुळे काम थांबवण्यात आले होते .मात्र त्यानंतर आठ महिने काम करून 2019 च्या एप्रिलमध्ये पुन्हा कामाला जोर धरण्यात आला आणि आता एक मोठे तळे ग्रामस्थांसाठी उपलब्ध झाले आहे.