Wednesday, January 22, 2025

/

बेळगाव ग्रामीण मधील पराभव काँग्रेसला जिव्हारी

 belgaum

खासदार सुरेश अंगडी यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारापेक्षा 3 लाख 91 हजार 304 इतकी जादा मते मिळवून आपला विजय निश्चित केला आहे. या मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतक्षेत्रात काँग्रेस उमेदवाराचा जास्ती फरक ठेऊन भाजपने पाडाव केला आहे. काँग्रेसचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांपैकी बेळगाव ग्रामीण, गोकाक व बैलहोंगल येथेही अगडीच सरस ठरले असून बेळगाव ग्रामीण मध्ये त्यांनी घेतलेले मताधिक्य काँग्रेस च्या जिव्हारी लागण्यासारखेच आहे.

बेळगाव दक्षिण मध्ये सुरेश अंगडी यांना सर्वाधिक लीड मिळाला आहे तर सर्वाधिक मते बेळगाव ग्रामीण मध्ये मिळाली आहेत.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघात अंगडी यांनी 1 लाख 17 हजार 947 मते घेत प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार व्ही एस साधूंनावर यांना 74 हजार 658 मतांनी पराभूत केले. याठिकाणी साधूंनावर यांना फक्त 43 हजार 289 मते पडली असून काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनेही ही चिंतेची गोष्ट ठरली आहे. या ठिकाणी आमदार असलेल्या काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बळकर यांनी 1 लाख 2 हजार मते विधानसभेला मिळवली होती पण यावेळी ही मते कुठे गेली हा प्रश्न असून काँग्रेस आमदार असलेल्या ठिकाणी झालेला हा पराभव चिंतेचा आहे.
बेळगाव दक्षिण मतदारसंघात अंगडी यांनी एकूण 1 लाख 17 हजार 590 मते घेतली असून साधूंनावर यांचा 89 हजार 663 मतांनी पराभव केला आहे. दक्षिण मध्ये साधूंनावर यांना 27 हजार 927 मते पडली. याठिकाणी विद्यमान आमदार भाजपचेच आहेत.
बेळगाव उत्तर मध्येही अंगडी यांनी साधूंनावर यांचा 28 हजार 428 मतांनी पराभव केला, येथे अंगडी यांना 83 हजार 552 तर साधूंनावर यांना 55 हजार 125 इतकी मते पडली. याठिकाणीही भाजप आमदार असून काँग्रेसची मुस्लिम व इतर मते साधूंनावर यांना पडली आहेत.

Map belgaum lokssbha
गोकाक मतदारसंघात अंगडी यांना 1 लाख4 हजार 505 तर काँग्रेसचे साधूंनावर यांना 44 हजार 920 मते पडली असून फरक 59 हजार 585 इतका आहे. येथील काँग्रेस आमदार रमेश जारकीहोळी असतानाही हा काँग्रेस चा मोठा पराभव आहे.
आरभावी मतदारसंघात अंगडी यांना 1 लाख 2 हजार 715 इतकी मते पडली असून 55 हजार 293 इतके मताधिक्य घेऊन त्यांनी साधूंनावर यांचा पराभव केला आहे. येथे फक्त 47 हजार 422 मतांवर साधूंनावर यांना समाधान मानावे लागेल.
बैलहोंगल या साधूंनावर यांच्याच गावात त्यांना फक्त 42 हजार 556 मते पडली असून 80 हजार 125 मते घेऊन अंगडी यांनी 37 हजार 569 मतांनी त्यांचा पराभव केला आहे

सौन्दत्ती येथे अंगडी यांना 68 हजार 666 मते पडली तर साधूंनावर यांना 58 हजार 502 मते पडली असून दोघांमधील फरक 10 हजार 164 आहे .रामदुर्ग मध्येही साधूंनावर यांचा अंगडी यांनी 30 हजार 982 मतांनी पराभव केला आहे, अंगडी यांना 81हजार886 तर साधूंनावर यांना 50 हजार 204 मते पडली आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.