बेळगाव आणि चिकोडीचे खासदार कोण याचा फैसला दिनांक 23 रोजी होणार आहे. मतमोजणीसाठी अवघे दोन दिवस उरले असून उमेदवारांबरोबरच कार्यकर्त्यांच्या मनातील धाकधूक वाढली आहे. अवघ्या दोन दिवसांवर हा फैसला होणार असून अनेकांचे लक्ष लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी कडे लागले आहे.बेळगाव मध्ये सध्या मतमोजणीची पूर्ण तयारी झाली असून यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे.
बेळगाव मतदारसंघात म ए समितीचे 43 उमेदवार व यासह एकूण 57 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये खरी लढत काँग्रेसचे साधूंनावर व भाजपचे सुरेश अंगडी यांच्यात होणार आहे. हे विशेष करून म ए समितीने आपला मराठी बाणा दाखवत महाराष्ट्र एकीकरण समितीचे 43 उमेदवार रिंगणात उतरून अनेकांच्या उरात धडकी भरवली होती. त्यामुळे आता साऱ्यांचे लक्ष या निकालाकडे लागून राहणार आहे.
चिकोडी मतदार संघात काँग्रेसचे प्रकाश हुक्केरी आणि भाजपाचे आण्णासाहेब जोल्ले यांच्यात खरी जंग होणार आहे. प्रकाश हुक्केरी यांनी राबवलेल्या विकास कामाची पोचपावती मिळणार की आण्णासाहेब जोल्ले यांनी केलेल्या सामाजिक कार्याची आणि मोदी च्या लाटेचा परिणाम होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागूले आहे. या साऱ्या बरोबरच कार्यकर्त्यांची ही धाकधूक वाढली आहे.
बेळगाव येथील मतमोजणी आरपीडी येथे होणार असून जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. त्याचबरोबर चिकोडी मतदारसंघाची मतमोजणी चिकोडी येथे होणार असून तिथेही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये हे यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मतमोजणीच्या पेटीत कुणाचे भवितव्य उजळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.