बेळगाव तालुक्यातील धामणे येथील दोघी सख्या बहिणी महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी बनल्या आहेत. मागील वर्षी श्वेता बेळगुंदकर स्पर्धा परीक्षेत यश मिळवत कृषी सहाययक पदी निवड झाली होती त्या नंतर तिची लहान बहीण स्मिता बेळगुंदकर पाटील हिची देखील मंत्रालयीन सहाय्यक पदी निवड झाली आहे.
कु. स्मिता अनंतराव बेळगुंदकर उर्फ सौ. स्मिता रविंद्र पाटील मु पोस्ट धामणे बेळगाव सध्या राहणार शिनोळी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेमधून *’मंत्रालयीन सहाय्यक’* पदी *राज्यात १८ व्या क्रमांकाने* निवड झाली.
त्यांचे माहेरचे गाव मु.पो. शिनोळी खुर्द, ता. चंदगड हे आहे. त्यांनी पदवीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर सन २०१५ साली स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासास कोल्हापूर येथील महानगरपालिकेच्या अभ्यासिकेत सुरुवात केली. तसेच सन २०१८ साली लग्नानंतर पुणे येथील खाजगी अभ्यासिकेत अभ्यास केला. त्यांच्या आई निवृत्त प्राथमिक शिक्षिका असुन वडील रिएल ईस्टेट मध्ये काम करतात. तर त्यांचे पती पुणे येथे शासकीय सेवेत कार्यरत आहेत. तिची असणारी दृढ इच्छाशक्ती व अभ्यासातील सातत्य तसेच आई-वडिलांनी शिक्षणासाठी घेतलेले कष्ट आणि लग्नानंतर पतीची मिळालेली साथ यातुन तिने आपले यश मिळविले आहे.
श्वेताची आणि स्मिताची आई निवृत्त प्राथमिक शिक्षिका आहे तिचे मार्गदर्शन तिला लाभले .त्याच बरोबर वडिलांचे पाठबळ सुद्धा तिच्या यशात तितकेच महत्त्वाचे होते. गावकरी, तिचे शिक्षक, कुटुंबीय, यांची मदत तिला वेळोवेळी झाली आहे.दोन्ही मुलींनी बेळगावचे नाव उज्वल केलं आहे.

मागील वर्षी श्वेता हिची निवड झालेलो बेळगावं live ने छापलेली बातमी