अनेक प्रकारच्या कलामध्ये नृत्य ही कला बेळगाव शहरात फार प्रसिद्ध आहे विद्यार्थी वर्गाचे नृत्य या कलेकडे आकर्षण वाढू लागले आहे. बेळगाव शहर व उपनगरात अंदाजे शंभर नृत्य शाळा आहेत .या नृत्य शाळा मध्ये वेगवेगळ्या भागांतील रहानीमान नुसार फी आकारली जाते.
भारत नगर खासबाग रोड या भागात छोट्याशा ठिकाणी डान्स मास्टर तुकाराम महेंद्रकर आपले स्वतःचे नृत्य प्रशिक्षण केंद्र चालावीत आहेत.त्यांच्याकडं येणारी मुलं ही अति गरीब कुटुंबातली अहेत.झी टीव्हीचे प्रसिद्ध कोरिओग्राफर मास्टर रवी सेट हे तुकाराम महेंद्रकर यांचे गुरु आहेत. त्यांनी आठ वर्षापूर्वी याच ठिकाणी एक छोटासा साऊंड बॉक्स व समोर एक मिरर लाउन नटराजा चे पूजन करून आपला प्रवास प्रारंभ केला.बत्यांच्याकडं भाजी विक्रेता, सेंट्रींग कामगार,विणकर, व मोलमजुरी करणारे ,यांची मुलं शिकण्यास येतात फी कोणीही दिलं आणि नाही दिला याचा विचार न करता गेल्या आठ वर्ष सातत्य परिश्रम करीत आहेत.
सुरुवातीच्या चार वर्षे ते विविध ठिकाणी डान्स स्पर्धेत भाग घेत होते प्रत्येक ठिकाणी प्रवेश फी देऊन भाग घ्यावा लागत होता. या स्पर्धातून त्यांच्या हाती फक्त निराशा यायची मात्र अपयशाने ते कधीच खचून गेले नाहीत त्यांच्यावर लोक हसायचे तुकाराम आता बस कर म्हणायचे. पण या तुकारामाने मात्र आपल्या पांडुरंगावर विश्वास ठेवत कधीही हार मानली नाही. त्यांची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्यांनी उभा केलेली टीम ,आणि टीम चा त्यांचे मास्टर तुकाराम यांच्यावर असलेला विश्वास या जोरावर त्यांनी भरमसाठ यश मिळविले.
गोवा येथे दिनांक 26 मे रोजी दक्षिण भारत लोकनृत्य स्पर्धा होणार आहे या स्पर्धेत त्यांचे संघाची बीट ब्रेकर्स यात निवड झाली असून याठिकाणी ते हनुमंतावर आधारित जय हनुमान ज्ञान गुण सागर या गीतावर नृत्य सादर करणार आहेत.
गेल्या तीन वर्षांमध्ये तुकाराम यांच्या टीमने अनेक ठिकाणी पारितोषिके जिंकली असून ते सध्या यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत.गोकाक, बैलहोंगल, मुरगोड, हुबळी-धारवाड, लोळसुर , खानापूर, नंदगड, अशा अनेक ठिकाणी त्यांनी नृत्य सादर करून लोकांची वाहवाही मिळविली त्यांनी सादर केलेला काली माते वर आधारित नृत्य सर्वात लोकप्रिय झाले आहे.
मास्टर तुकाराम यांच्या बीट ब्रेकर्स या संघात प्रियंका गच्ची, युवराज हुलमनी, ओमकार बिरजे सुरज दंडगल, यल्लाप्पा खंनुकर, गणेश मेस्त्री ,सुजाता वरणेकर ,अंकिता, राकेश बिर्जे ,रोहित ,मंजुनाथ महिंद्रकर ,आदींचा समावेश असून सागर कलबुर्गी यांचे मोलाचे मार्गदर्शन वेळोवेळी त्यांना लाभत आहे.