भाजपचे बेळगावचे विध्यमान खासदार सुरेश अंगडी यांचा विजय 391304 मतांच्या फरकांनी झाला आहे . जवळपास चार लाख मतांच्या फरकांनी निवडून येत त्यांनी सलग चौथ्यांदा लोकसभेत प्रवेश केला आहे.
सुरेश अंगडी यांना 761991 एवढी मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार डॉ व्ही एस साधूंनावर यांना 370687 मते मिळाली.एकूण मतांपैकी सुरेश अंगडी यांना 63.22% मते तर डॉ व्ही एस साधूंनावर यांना 30.76%मते मिळाली. निवडणूक आयोगाने हा आकडा अंतिम नसला तरी यात किरकोळ बदल होऊ शकतो.
मागील 2014 लोकसभा निवडणूकी पेक्षा या निवडणुकीत भाजपचा मतदानाचा टक्का वाढला असून कॉंग्रेसचा टक्का घटला आहे. मागील वेळी भाजपच्या विजयाचा फरक 75860 मतांचा म्हणजे 7.3% होता.या निवडणुकीत भाजप काँग्रेस व्यतिरिक्त सर्व 56 उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले आहे.