भरधाव वेगाने जाणाऱ्या यामाहा दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकाला आदळून झालेल्या अपघातात बी बी ए शिकणारा एक विद्यार्थी ठार तर एकजण जखमी झाला आहे.शनिवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान गोगटे सर्कल उड्डाण पुलावर ही दुर्घटना घडली होती.तर पहाटे त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
मल्लिकार्जुन आप्पांना दरूर वय 25 मूळचा अथणी सध्या राहणार गोंधळी गल्ली असे मयत विद्यार्थ्यांचे नाव असून अक्षय कुंभार नावाचा त्याचा रूम मेट देखील या अपघातात जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मल्लिकार्जुन आणि अक्षय हे दोघेही आर एल एस कॉलेजचे बी बी ए चे विद्यार्थी असून गोंधळी गल्लीत भाड्याच्या खोलीत राहत होते. शनिवारी रात्री ते गोवावेस कडून गोंधळी गल्लीकडे परतत असतेवेळी गोगटे सर्कल ब्रिज वर हा अपघात झाला आहे.
दुचाकी वर नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडक दिल्याने दोघेही जखमी झाले होते लागलीच त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले मात्र मल्लिकार्जुन च्या डोक्यावर जबर मार लागल्याने पहाटे चार वाजता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला तर जखमी अक्षयवर उपचार सुरू आहेत.रहदारी दक्षिण पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.