लोकसभा निवडणुकीतील बेळगाव मधील भाजपचे उमेदवार खासदार सुरेश अंगडी यांना आणखी फटका बसला आहे निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रचार करण्यासाठी 72 तासांचा निर्बंध लावण्यात आल्यामुळे बेळगाव भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराला येऊ शकणार नाहीत. त्यामुळे आधीच सगळीकडे विरोध होत असताना स्टार प्रचारक येऊ शकले नसल्यामुळे बेळगाव भाजपच्या उमेदवारांना मोठा फटका बसला आहे.
बेजबाबदार वक्तव्ये केली त्यामुळे निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ आणि मायावती यांच्यावर अनुक्रमे 72 तास आणि 48 तास निर्बंध लागू केल्याची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्यानंतर 72 तासाच्या आत कोठेही योगी आदित्यनाथ पक्षाच्या प्रचाराची सभा घेऊ शकत नाहीत अशी अडचण निर्माण झाली आहे. बेळगाव मध्ये 17 तारखेला योगी आदित्यनाथ अंगडी यांचा प्रचार करण्यासाठी येणार होते मात्र आता मोदी नाही व योगी आदित्यनाथ ही नाही अशी परिस्थिती बेळगाव भाजपचे उमेदवार सुरेश अंगडी यांच्यावर निर्माण झाली आहे.
2004 च्या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी सुरेश अंगडी यांच्या प्रचाराला आले होते, तर 2014 च्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेले नरेंद्र मोदी यांनी सीपीएड मैदानावर अंगडी यांच्यासाठी सभा घेतली होती मात्र या वेळी बेळगाव वगळून चिकोडीत आण्णासाहेब जोल्ले यांच्यासाठी मोदी सभा घेणार आहेत, यापूर्वी तीन वेळा मोदी यांनी बेळगावला येणे टाळले आहे. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा विरोध हेच कारण यासाठी निश्चित झाले होते सध्या मोदी नसले तरी योगी आदित्यनाथ येतील या आशेवर अंगडी यांचा प्रचार सुरू होता मात्र मोदी यांच्यावर निर्बंध लादले गेल्यामुळे त्यांचे काय होणार असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना सतावत आहे.
भाजप कार्यकर्ते अंगडी यांच्या प्रचारात तोंडदेखले फिरत असून काहींनी विरुद्ध प्रसार प्रचार सुरू केला आहे. त्यांची पुन्हा उमेदवारपदी निवड त्यांना मान्य नव्हती मात्र आता योगी येणार असल्यामुळे काहीतरी होईल आणि मतदारांमध्ये फरक पडेल असे वाटत असतानाच योगी यांचाही दौरा रद्द करावा लागणार असून त्यामुळे अंगडी परत अडचणीत आले आहेत